मुंबई: सांताक्रुझ येथील वाकोला ब्रिजजवळ बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात
Best Double Decker Bus Accident (Photo Credits: Twitter)

सांताक्रुझ (Santacruz) येथील वाकोला (Vakola) परिसरात एका डबल डेकर (Double Decker) बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. बेस्ट (BEST) बसच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात वाकोला पुलावर दुपारी 1.05 वाजता झाला. ही बस मरोळ डेपोहून कुर्ला डेपोत जात होती. मात्र काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडली. (विक्रोळी येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर एक जखमी)

ट्विट:

वाकोला ब्रिजजवळील ओव्हरहेट  गॅन्ट्री बारवर धडकल्याने बसचा वरील डेक आणि तीन सीट्स डॅमेज झाल्या. मात्र यात कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती बेस्ट बसच्या प्रवक्तांनी दिली आहे.