प्रातिनिधिक प्रतिमा

मुंबईतील (Mumbai) टॅक्सी भाड्यात 8 रुपयांनी वाढ करावी अशी मागणी टॅक्सीमेन्स संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांना याबद्दल पत्र सुद्धा देण्यात आले आहे.

गेल्या वर्षात जून महिन्यात टॅक्सी चालकांनी रावते यांच्याकडे टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरु 25 रुपये करावे अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारकडून या मागणीसाठी कोणताही निर्णय देण्यात आला नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाने 2015 रोजी भाडेवाढ करत 25 रुपये केले होते. त्यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली.(नागरपूरचे मेट्रो स्टेशन सजणार भव्यदिव्य अशा शिल्पाकृतींनी, पाहा काय होणार विशेष बदल)

तर आता टॅक्सी भाववाढीबाबत खटुआ समितीने राज्य सरकारकडे प्रति किमी 1-2 रुपये दराने टॅक्सीचे दर पुन्हा जाहीर करण्यात यावे असे म्हटले होते. परंतु सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे वाढत्या सीएनजीच्या किंमतीमुळे 22 रुपयात टॅक्सी चालवणे परवडत नसून भाडेवाढ करुन ती 30 रुपये करण्यात यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.