मुंबईतील (Mumbai) एका वरिष्ठ पोलीस निरक्षकाने डान्सबार मध्ये चालू असलेल्या अवैध चाळ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निलंबन करण्यात आले आहे. तर गोकूळसिंग पाटील असे या पोलीस निरिक्षकाचे नाव असून डान्सबार मध्ये चालू असलेल्या गोरख धंद्यांकडे दुर्लक्ष करत होता.
तर गावदेवी येथील परिसरातील डान्सबारची जबाबदारी पाटील याच्याकडे होती. तर ग्रँन्ड रोड येथील एप्रिल 27 रोजी गोल्डन रोज रेस्टाँरंट आणि बारवर शिवदीप लांडे यांनी छापा घातल्यावर अवैध धंद्यांचा प्रकार उघडीकस आला. त्यावेळी पाटील याच्या देखरेखीखाली हा बार येत असल्याचे समोर आले. छापा टाकल्यानंतर 51 पुरुषांना अटक केली आणि आठ बारबालांची त्यावेळी सुटका करण्यात आली. तसेच डान्सबारचे वैध लायन्ससुद्धा नसल्याचे तेव्हा समोर आले.(सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या)
या प्रकारानंतर पाटील ह्याला अटक करण्यात आली होती. तसेच आयुक्तांच्या सुचनेनंतर बारवर कारवाई करण्यात आल्यानंतर पाटील याला निलिंबत करावे असे आदेश देण्यात आले.