Mumbai Water Issue: भरपावसात मुंबई तहाणलेलीच, धरणात अद्यापही अपेक्षीत पाणीसाठा नाही; जाणून घ्या टक्केवारी
BMC (File Image)

मुंबई आणि परिसरातील भागात सोमवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणातील पाणीसाठा वाढला. या सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरची क्षमता आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळूनही नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सुमारे 20% पाणीसाठा आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)

मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या 7 धरणांमध्ये किमान 80% पाणीसाठा झाल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. दरम्यान या पावसामुळे 71 हजार 147 दशलक्ष लिटर पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांच्या पाणीसाठ्याची चिंता मिटल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान मुंबई शहर, उपनगरांत आणि ठाण्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून धरणात पाणी जमा होण्यास पुन्हा एकदा मोठा पाऊस पडण्याची प्रतिक्षा आहे. सध्या धरणात असेलेल्या पाण्याची स्थिती ही समाधानकारक नसल्याने काही दिवस तरी मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना हा करावा लागू शकतो.