जगप्रसिद्ध अशा मुंबईच्या डबेवाल्यांचा, उद्योगात सक्रिय असणाऱ्या तोतयां विरोधातील लढ्याला आरंभ
Mumbai Dabbewala | (Picture Credit: Wikimedia Commons)

जगप्रसिद्ध अशा मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांच्या उद्योगांमधल्या तोतयांना आळा घालण्यासाठी आज ठोस पावलं उचलली आहेत. 1955 साली नोंदणी झालेल्या 'नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट', 1970 साली नोंदणी केलेल्या 'मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ' तसेच अधिकृत संस्था 'संत ज्ञानेश्वर डबे वाहतूक मंडळ, मुलुंड', 'भिमाशंकर जेवण डबे वाहतूक मंडळ, ग्रांट रोड' आणि 'घाटकोपर जेवण डबे वाहतूक मंडळ, घाटकोपर' यांनी खऱ्या डबेवाल्यांच्या नावाखाली सोंग घेऊन फिरणाऱ्या बाराहून अधिक जणांचा खरपूस समाचार घेतला आहे.

''या संस्थांव्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला किंवा संघटनेला डबेवाले म्हणून ग्राहकांशी संवाद साधता येणार नाही, किंवा प्रतिनिधित्व करता येणार नाही'', असे वकील अमोल सुत्राळे म्हणाले.

डब्बेवाल्यांसाठी जमणाऱ्या अनेक प्रकारच्या, ज्यावर खरा अधिकार डब्बेवाल्यांचा आहे, अशा कल्याण निधींना, लाटणाऱ्या खोट्या प्रवृत्तींना आळा बसेल, असेही ते म्हणाले. अजून पुढचं पाऊल उचलत, युट्युब, गुगल आणि अन्य काही वेबसाइट्सशी संपर्क साधून त्यांना या तोतया संघटनेंचे आणि लोकांचे फोटो आणि माहितीपर विडिओ हटवायला सांगणार आहेत, अशीही पुष्टी जोडली.

अमोल सुत्राळे यांनी घडलेल्या नोटीस मध्ये अनेक तोतया संघटनांचे सूत्रधार, पवन अग्रवाल, पियुष अग्रवाल (दोघेही विक्रोळी), अनंत तळेकर (वरळी), भागजी रौंधानी आणि विठ्ठल सावंत (अंधेरी), दशरथ केदारी (जोगेश्वरी), सुबोध सांगळे (ग्रांट रोड), मयूर क्रांती आणि ऋषभ क्रांती (दोघेही गोरेगाव) यांची नावे आहेत.