Maharashtra Flood: मुंबई डब्बावाला एसोसिएशन आणि मुंबई रोटी बॅंक पूरग्रस्तांसाठी सरसावले
Sangli Flood (Photo Credits: Twitter)

कोल्हापूर, सांगली, सातारा भागामध्ये पूरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता जसं हळूहळू पाणी ओसरायला सुरूवात होईल तशी बेघर झालेल्या अनेकांना मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता आता सामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेक जण पुढे आले आहेत. मुंबईचा डब्बेवालादेखील आता पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पुढे आला आहे. मुंबई डब्बावाला एसोसिएशन आणि मुंबई रोटी बॅंक कडून मदत जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?

मुंबई डब्बेवाला असोसिएशन आणि रोटी बॅंक कडून खाद्यपदार्थ आणि इतर अत्यावश्यक गोष्टी एकत्र केल्या जाणार आहेत. त्याची मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहचवली जाणार आहे. सध्या सांगली दौर्‍यावर असणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर ओसरल्यानंतर गावांचं पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक मदतीसाठी इच्छुकांनी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना शिर्डी देवस्थानाकडून 10 कोटीची मदत तर सिद्धिविनायक मंदिरकडून पिण्याच्या पाण्याची सोय

ANI Tweet

सांगली, कोल्हापूरमध्ये कोयनामधून झालेल्या विसर्गामुळे पूराची स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.पूर परिस्थितीमुळे लाखो कुटुंबांचे विस्थापन झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली आहे.