मुंबईतील चेंबुर (Chembur) परिसरात गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) मोठा स्फोट घडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चेंबुरच्या जुनी बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 4 जण गंभिर जखमी असल्याचे समजले आहे. (हेही वाचा - Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात भीषण आग; 10 वाहने जळून खाक)

पाहा पोस्ट -

पाहा व्हिडिओ -

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. वरती अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर 4 जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.