मुंबईत (Mumbai) सध्या दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्याचसोबत वाहतुकीची साधनेसुद्धा वाढत चालली आहे. याच स्थितीत आता खासगी वाहतुक कंपन्या ओला, उबर यांनी प्रवाशांच्या प्रवासाठी टॅक्सी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-टॅक्सी (E-Taxi) सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
ई-टॅक्सीची सुविधा ही सीएसएमटीसह मध्य रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकावर सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने मेरु कॅब या कंपनीसोबत करार केला आहे.मेरु कंपनीसोबत करण्यात आलेल्या या करामुळे मध्य रेल्वेला वर्षभरात चार लााख रुपयांचा महसूल मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर सीएसएमटी स्थानकाबाहेरुन प्रवाशांना पीक अप केले जाणार आहे.(मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी अजूनही 2 दिवस लागणार - मध्य रेल्वेची माहिती)
प्रवाशांना या सुविधेचा लाभ अॅपवरुन टॅक्सीचे बुकिंग करता येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ही सुविधा प्रथम सुरु करण्यात येणार आहे. त्याचसोबत दादर,ठाणे, एलटीटी आणि पनवेल या गर्दीच्या ठिकाणी ई-टॅक्सीसाठी पिक अप झोनची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र या टॅक्सीच्या पार्किंगबद्दल मध्य रेल्वे अद्याप विचार करत आहेत.