मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी अजूनही 2 दिवस लागणार - मध्य रेल्वेची माहिती
Representational Image (Photo Credits: Youtube)

मुंबईसह पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागात कोसळत असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सतत कोसळत असणार्‍या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे (Mumbai Pune Rail Service) सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई मधून सुटणार्‍या अनेक गाड्या कर्जत मार्गे पुण्यावरून पुढे जातात. मात्र 3 ऑगस्टपासून विस्कळीत झालेली ही सेवा पूर्ववत होण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

TOI च्या वृत्तानुसार, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे सेवा विस्कळीत झाल्याने सुमारे 35 कोटींचं नुकसान झालं आहे. पुण्याच्या रेल्वेमार्गावरील मध्य लाईन लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. Kolhapur Rain Updates: मध्य रेल्वे आजपासून 3 दिवस चालवणार मिरज - कराड मार्गावर विशेष रेल्वे; पूरामुळे रस्ते वाहतूक अद्याप विस्कळीत

बोरघाटातून मुंबई-पुणे ट्रेन वाहतूक रखडली असल्याने 11 ऑगस्ट 2019 पर्यंत डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह अन्य गाड्या धावणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ऑगस्टपासून मुसळधार पावसामुळे दरड कोसळणं, माती भुसभुशीत झाल्याने वाहतूक मंदावली आहे. यामुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणारी सेवा विस्कळीत करण्यात आली आहे. यामध्ये 370 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ स्थानकातील रेल्वे सेवा दोन दिवसांनंतर रूळावर आली आहे. या लोकलसेवा 20 kmph च्या वेगाने धावत आहेत.