मुंबई: गुन्हे शाखेने कुरार भागात टाकलेल्या छाप्यात 3.2 किलोचे चरस जप्त, एका ड्रग्ज पेडलरला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - फेसबुक)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput Case) मुंबईत मोठ्या प्रमाणावर पसरलेले ड्रग्ज रॅकेट समोर आले आले. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) आतापर्यंत मुंबईतील अनेक भागांतून ड्रग्ज साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर अनेक ड्रग्ज पेडलरला अटक देखील केली आहे. त्यातच काल (12 फेब्रुवारी) मुंबईच्या कुरार (Kurar Area) भागात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून मुंबई गुन्हे शाखेच्या हाती 3.2 किलो ड्रग्जसाठा लागलाय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ड्रग्ज साठ्यासह ड्रग्ज रॅकेटचा मोठा सूत्रधार हाती लागला आहे.

मुंबई गुन्हे शाखेने एका ड्रग्ज पेडलरला अटक केली असून त्याच्याकडून 1 कोटी 2 लाखांचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. तसेच हा अटक केलेला आरोपी ड्रग्ज रॅकेटचा मोठा नेता असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.हेदेखील वाचा- मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून अनेक ठिकाणी NCB चे छापे; आतापर्यंत 100 ग्रॅम मेफेड्रोन, 1.034 किलो सायकोट्रॉपिक औषधे जप्त

महिन्याभरापूर्वी मुंबईच्या मिरारोड परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात ड्रग्जचा पुरवठा करणारा चांद मोहम्मद याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून 400 ग्रॅम MD जप्त करण्यात आला असून याची किंमत 8 ते 10 लाखांपर्यंत आहे. तसेच यात हॉटेलमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्रीलाही ताब्यात घेण्यात आले होते.