NCB Raid In Mumbai (Photo Credits: Twitter/ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत थर्टी फर्स्टचे (31 December 2020) म्हणावे तसे सेलिब्रेशन करता आले नाही. महाराष्ट्र सरकाराने नाइट कर्फ्यू घोषित केल्याने अनेक निर्बंध आले. त्यातच सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये समोर आलेले बॉलिवूड ड्रग्ज रॅकेटही प्रचंड गाजले. यात मुंबईत अनेक ड्रग्ज पेडलर (Drugs Peddlers) आणि ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने या अमली पदार्थाची विक्री होऊ नये आणि त्याचे सेवन केले जाऊ नये यासाठी पोलिसांसोबत NCB ने धडक मोहिम सुरु केली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरु केलेल्या या धडक मोहिमेत NCB बराच ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

एनसीबीच्या मुंबई पथकाने नवीन वर्षाच्या संध्याकाळपासून शहरातील अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात त्यांना आतापर्यंत 4 ड्रग्ज विक्रेत्यांकडून 100 ग्रॅम मेफेड्रोन, 1.034 किलो सायकोट्रॉपिक औषधे हस्तगत केली. ही माहिती NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी 58 कोटी रुपयांचे Mephedrone जप्त, महाराष्ट्रातील ATS कडून 13 जणांना अटक

तसेच NCB ची धाड मोहिम अद्याप सुरु असून मुंबईत अमली पदार्थांची विक्री होऊ नये हा एकच उद्देश्य NCB समोर आले. त्या दिशेने तपास सुरु असून संशयित ठिकाणी छापे मारण्याची NCB ची मोहिम सुरु आहे.

मागील महिन्यात मुंबईच्या गोवंडी भागातील शिवाजी नगर परिसरात 33 लाख किंमतीचे ड्रग्ज पिल्स (Durgs Pills) पोलिसांनी जप्त केले आहे. अँटी नारकोटिक सेल च्या पथकाने ही कारवाई केली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.