Mumbai Murder Case: वांद्रे परिसरात 21 वर्षीय तरूणाकडून प्रेयसीची हत्या; खोट्या बलात्काराच्या आरोपांना, दीड लाख रूपयांच्या मागणीतून उचललं टोकाचं पाऊल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मुंबईच्या क्राईम ब्रांच युनिट ने एका 21 वर्षीय तरूणाला हत्येच्या प्रकरणामध्ये अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडकडून खोट्या बलात्काराच्या आरोपांना कंटाळून आणि दीड लाख रूपयांच्या मागणीवरून तिची हत्या केल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार वांद्रे येथील सेंट फ्रांसिस चर्च (St. Francis Church) जवळ घडला आहे. तेथेच तरूणीचे मृत शरीर देखील आढळले. दरम्यान पोलिसांना तरूणीच्या शरीरावर ताज्या जखमा आढळल्या आहेत. यावरून पोलिसांना असा संशय आहे की त्या तरूणीच्या हत्येपूर्वी तिला मारहाण झालेली असू शकते.

पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी केली आहे. तरूणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असे समजले की हे दोन्ही तरूण झारखंडचे रहिवासी आहे. आरोपी मुलगा झारखंडला पळून जाण्याच्या प्रयत्नांमध्येच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. रविवारी रात्री या प्रेमी युगुलामध्ये कडाक्याचं भांडणं झालं आणि त्याच रागाच्या भरात तरूणाने प्रेयसीचा जीव घेतला. Mumbai Rape: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक, मुंबईच्या अंधेरी येथील धक्कादायक घटना.

ANI Tweet

पोलिस तपासामध्ये दिलेल्या कबुलीत आरोपी म्हणाला प्रेयसीने त्याला धमकी दिली होती की जर त्याने दीड लाख रूपये परत केले नाही, लग्नाच्या वचनापासून मागे फिरला तर ती पोलिसांमध्ये धाव घेणार आणि त्याला बलात्काराच्या प्रकरणामध्ये अडकवणार. सध्या पोलिसांकडून यावर अधिक तपास सुरू आहे. सध्या संबंधित आयपीसी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.