प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Mumbai:  कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेकडून पार्क आणि गार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेला. परंतु रविवारी काही ठिकाणी पार्क आणि गार्ड सुरु किंवा बंद ठेवण्याबद्दल गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. सकाळी ते सुरु करण्यात आले पण संध्याकाळी बंद ठेवल्याने विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या या संदर्भातील नियमावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत.(पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून मास्क घालण्याचे नागरिकांना केले आवाहन, सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेला व्हिडिओ Watch It)

समाजवादीचे आमदार आणि नगरसेवक रईस शेख यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, मुंबईतील सर्व पार्क किंवा गार्ड हे बंद ठेवण्यात येत आहे. परंतु जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात त्याबद्दल लिहिलेले नाही. राज्य सरकारने फक्त अम्युजमेंट पार्क, झू किंवा म्युझिम येथे नागरिकांची अधिक गर्दी होत असल्याने बंद करण्याचे म्हटले होते. जिम, सलून, स्पा, हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. पण पार्क आणि गार्ड बंद करण्याचा हा एकतर्फी निर्णय आहे. बहुतांश जेष्ठ नागरिक आणि स्थानिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या असून व्यायामासाठी कोणती जागा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने या नियम हटवून पार्क किंवा गार्डन हे नागरिकांसाठी खुले केले पाहिजे असे शेख यांनी म्हटले.(Corona Virus Update: पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांना आता कोरोना लसीचे दोन्ही डोस पुर्ण असणे अत्यावश्यक)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पार्क आणि गार्डन हे बंद ठेवले जातील असे म्हटले होते. परंतु नंतर ते सकाळी 5-9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5-8 वाजेपर्यंत सुरु ठेवले जात आहेत. महापालिकेच्या जी-नॉर्थ येथे सर्व पार्क आणि गार्डन हे बंद ठेवल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नव्या परिपत्रकानुसार, महापालिकेच्या क्षेत्रातील पार्क किंवा गार्ड हे 10 जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद असतील असे म्हटले आहे.