मुंबई मधील महाविद्यालयातील 46 टक्के तरुण चाईल्ड पोर्नोग्राफीकडे आकर्षित तर 10 टक्के तरुणी गर्भपाताच्या दिशेला वळतायत- सर्व्हे
प्रातिनिधिक, प्रतिकात्मक आणि संपादित प्रतिमा ( (Photo Credit: File Photo))

मुंबई (Mumbai) मधील महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका सर्व्हेच्या माध्यमातून धक्कादाक बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार महाविद्यालयातील तरुण सर्वात जास्त पॉर्न फिल्म (Porn Film) पाहतात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एका आठवडाभरात 40 पॉर्न फिल्म पाहत असल्याचा ही खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे. रेस्क्यू रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांना हा सर्व्हे केला आहे. या ट्रस्टने तरुणांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography) पाहण्याची वाढती उत्सुकता आणि त्यामुळे मनावर होणारे परिणाम याबाबत अधिक माहिती दिली आहे.

सादर करण्यात आलेला रिपोर्ट जवजवळ 500 विद्यार्थ्यांसोबत बातचीत करुन तयार करण्यात आला आहे. तर रिपोर्टमधील 500 विद्यार्थी मुंबईतील 30 विविध इंग्रजी महाविलात शिकत आहेत. त्यामधील तरुाणांची संख्या 188 असून तरुणींची आकडेवारी 345 एवढी आहे. तसेच या विद्यार्थ्यांचे वय 16-22 वर्षादरम्यानचे आहे. त्याचसोबत 63 टक्के विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, ते हिंसक पॉर्न पाहताना त्यामध्ये स्वत: असल्याचे भासवतात. तर 33 टक्के तरुण आणि 24 टक्के तरुणी पॉर्न पाहून नग्न अवस्थेतील फोटो एकमेकांसोबत शेअर करतात. 35 टक्के विद्यार्थी असे म्हणत आहेत की, सातत्याने पॉर्न पाहिल्याने आम्ही सेक्शुअल संबंधिक काही गोष्टींसोबत जोडले जातो. मात्र या रिपोर्टमधील अजून एक धक्कादायक बाब म्हणजे 10 टक्के महाविद्यालयीन तरुणी गर्भपात करण्याच्या दिशेने वळत आहेत.

या सर्व्हेचा मुळ उद्देश विद्यार्थ्यांकडून पाहण्यात येणाऱ्या हार्ड कोर पॉर्न संबंधित त्यांचे विचार आणि त्याचा मनावर होणार परिणाम याबाबत सांगण्यात आले आहे. त्याचसोबत काहीजण चाईल्ड पॉर्न पाहून स्वत:चे न्यूड फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा शेअर करत आहेत. तर 46 टक्के तरुण चाईल्ड पॉर्न पाहत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आठ मधील एक तरुणी पैशांसाठी सेक्स करण्यासाठी तयार होत असल्याचा ही खुलासा करण्यात आला आहे.(पुणे: स्पा मसाजच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, पोलिसांनी धाड टाकत 5 परदेशी तरुणींना घेतले ताब्यात)

एनबीटीच्या एका रिपोर्टनुसार, ट्रस्टचे मुख्याधिकारी अभिषेक क्लीफर्ड यांनी असे म्हटले आहे की, चाईल्ड पॉर्न संबंधित करण्यात आलेला सर्व्हे धक्कादायक आहे. त्याचसोबत पॉर्नोग्राफी कॅन्सरच्या आजाराप्रमाणे नाते संपण्याच्या मार्गाने वळत आहे. एवढेच नाही महाविद्यालयातील तरुण-तरुणींमध्ये नकारात्मक भावना सुद्धा अधिक जागृत होत आहे. तर हार्ड कोर सेक्स व्हिडिओ पाहिल्याने ओरल सेक्स करण्याची विद्यार्थ्यांमध्ये मागणी वाढली आहे. परंतु यामुळे एचआयव्ही सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता फार आहे.