मुंबईकर गारठले तापमान 11 अंश तर पुणे येथे तापमानाचा पारा 5.1 पर्यंत घसरला
मुंबईकर गारठले तापमान 11 अंश तर पुणे येथे तापमानाचा पारा 5.1 पर्यंत घसरला (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Mumbai-Pune Winters: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी अधिकच जोर धरला असून राज्यात विविध ठिकाणी थंडीमुळे लोक गारठून गेल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान खात्याने ही शुक्रवार (8 फेब्रुवारी) आणि शनिवार (9 फेब्रुवारी) थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी मुंबईत कमाल तापमान 11 अंश सेल्सियस पर्यंत येऊन पोहचले होते. तर पुण्यात तापामानाचा पारा 5.1 पर्यंत घसरला.

मुंबईत थंडीचे तापमान कमीतकमी 11 ते 16 अंश सेल्सियस एवढे होते. तर सांताक्रुझ हवामान खात्याने 11 अंश तापामान असल्याचे वर्तविले होते. तर कुलाबा येथे तापमान 15.6 अंश सेल्सियस असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे 10 अंश सेल्सियस तापमानाचा पारा दिसून आला. मात्र एमएमआरडीच्या ठिकाणी तापमानाचा पारा 8.8 अंश सेल्सियस वर येऊन पोहचला होता.(हेही वाचा-Mumbai Winters: मुंबईकर शुक्रवारी दुपारीसुद्धा थंडीमुळे कुडकुडले, आजवर सर्वात कमी तपमानाची नोंद)

तर पुण्यात फेब्रुवारी महिन्यात दशकातील थंडीच्या तापमानाने रेकॉर्ड मोडला आहे. शनिवारी पुण्यात थंडीचे तापमान चक्क 5.1 अंश सेल्सियस वर येऊन ठेपले होते. त्यामुळे पुणेकर यंदाच्या थंडीमुळे चांगलेच कुडकुडले आहेत. तर नाशिक येथे 4 अंश सेल्सियस पर्यंत तापमानाचा पारा घसरला होता. तर नाशिक नंतर पुण्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त थंडीचे वातावरण दिसून आले आहे. त्याचसोबत मध्य-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विर्भात अचानकपणे थंड वारे वाहू लागल्याने तेथेही तापमानात बदल झाला आहे.

राज्यातील तापमान पुढील प्रमाणे:

नाशिक- 4 अंश सेल्सियस

अहमदनगर- 6.1 अंश सेल्सियस

औरंगाबाद- 6 अंश सेल्सियस

सातारा-6.8अंश सेल्सियस

नागपूर- 8.9 अंश सेल्सियस

मुंबई- 11 अंश सेल्सियस