पुढील काही दिवसात मुंबईतील किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता ‘मुंबई रेन’ने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे. 19 ते 20 फेब्रुवारीला उत्तरेकडून थंड वारे वाहण्यासाठी थोडा वेळ लागेल. समुद्राच्या वाऱ्याची सक्रियता कायम असेल, त्यामुळे तापमान जास्त वाढणार नाही. अर्थात मुंबईत पुन्हा आल्हाददायक, आरामदायी हवामान तयार होणार असून लोकांना या हवामानाचा आनंद घेता येणार आहे. ( Weather Update Today: देशभरात 10 राज्यांमध्ये पाऊस, महाराष्ट्रातील हवामाना अंदाज काय? घ्या जाणून)
पुढील आठवड्यात मुंबईतील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. यामुळे सोमवार ते शनिवार मुंबईकरांना गारवा अनुभवता येणार आहे. पुणे येथील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तापमान 34 अंश ते 35 अंशांवरून 30 अंशांपर्यंत खाली येईल अशी शक्यता आहे.
दरम्यान सध्या मुंबईसह देशात देखील तापमानाचा पारा हा चढला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने मुंबईकर हैरान झाले आहेत अशात पारा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा हा मिळणार आहे.