मुंबई मध्ये Punjabi Ghasitaram Halwai च्या फॅक्टरीत 'बालकामगारा'चा लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू; मिठाई कंपनीच्या एमडी विरूद्ध गुन्हा दाखल
Death/ Murder Representative Image Pixabay

मुंबई च्या माहीम भागात Punjabi Ghasitaram Halwai Pvt Ltd चे दोन अधिकारी आणि दोन करचारी यांना पोलिसांनी 15 वर्षीय मुलाच्या लिफ्ट मधील मृत्यूच्या प्रकरणात आरोपी केले आहे. ही घटना त्यांच्या माहिम च्या फॅक्टरी मधील आहे. कंपनी कडून हा मृत्यू एक नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र शाहू नगर पोलिस स्टेशन कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी Punjabi Ghasitaram Halwai Pvt Ltd च्या एमडी आणि मॅनेजर यांच्या विरूद्ध तसेच दोन Labour Contractors विरुद्धही अल्पवयीन मुलगा कामगार म्हणून दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जो अल्पावयीन मुलगा काम करत होता त्याला कामाच्या ठिकाणी लिफ्ट वापरताना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर 2 दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. कंपनीने ही माहिती लपवली. तसेच योग्य वैद्यकीय उपचार देखील दिले नाहीत. आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती HT च्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. 

“आम्हाला सायन रुग्णालयातून 10 फेब्रुवारीला फोन आला की, अंकित नावाच्या 15 वर्षीय मुलाला डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्याला दुखापती कशा झाल्या हे स्पष्ट झालेले नाही. 12 फेब्रुवारीला मुलाचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिस उपनिरीक्षक चंद्रबन पाटील यांनी केलेल्या एडीआरच्या तपासात हा मुलगा माहीम पूर्व येथील जास्मिन मिल रोड येथील पंजाबी घसीटाराम हलवाईच्या प्रोडक्शन युनिटमध्ये काम करत असल्याचे उघड झाले. 15 वर्षीय मुलाला 9 फेब्रुवारी रोजी कामगार कंत्राटदार रमजान खान आणि सुशील शेलोटे यांनी कारखान्यात आणले होते, त्यांना आता अटक करण्यात आली आहे.

कामगार अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मिठाई युनिटचे व्यवस्थापक उदयभान सिंग यांनी त्याला कामावर ठेवले. या मुलाचे नाव अंकित नसून कुणाल चौधरी (१५) असून तो मध्य प्रदेशातील वल्लभ नगर येथील राहणारा होता. युनिटमध्ये बेकायदेशीर लिफ्ट बसवण्यात आली होती, ज्याचे बटण बाहेर होते. हा मुलगा 10 फेब्रुवारी रोजी दुपारी लिफ्टमध्ये बसला आणि बटण दाबले परंतु त्याचे डोके आत जाण्यापूर्वीच तो लोखंडी गेटमध्ये अडकला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमी अवस्थेमध्ये त्यांनी मुलाला सायन रुग्णालयात नेले, पण चुकीचे नाव दिले. त्यांनी त्याच्या कुटुंबीयांनाही दुखापतीबाबत माहिती दिली नाही किंवा डॉक्टरांना त्याच्या दुखापतीबाबत संपूर्ण माहिती दिली नाही. “त्याच्या पोस्टमार्टम अहवालात डोक्याला दुखापत आणि चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे (अनैसर्गिक) मृत्यूचे कारण समोर आले आहे,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

"चौकशीनंतर, आम्ही जुहू येथे राहणारे पंजाबी घसीटाराम हलवाई प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक कुणाल बजाज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कारण त्यांनी त्यांच्या मिठाई कारखान्याच्या आवारात बेकायदेशीर लिफ्ट बसवण्यास परवानगी दिली होती, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला," पोलिसांनी सांगितले. अधिकारी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या 304 (II) , 34 आणि कलम 1 आणि बाल न्यायाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.