Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport News: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरी जवळपास 250 विमानांची उड्डाणे येत्या 17 ऑक्टोबर रोजी जवळपास रद्द करण्यात आली आहेत. पावसाळ्यानंतरची कामे आणि काही इतर देखभाल दुरुस्ती आदी कारणांमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. हा नियमीत देखभालीचा भाग असल्याने घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल संबंधित भागधारक आणि प्रवाशांसाठी आवश्यक माहिती यापूर्वीच देण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने म्हटले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निश्चित दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. प्रशासनाने शुक्रवारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

एअरमन (NOTAM) द्वारा याबाबतची नोटीस सहा महिन्यांपूर्वीच आगाऊ काढण्यात आली होती. जेणेकरुन संबंधित भागधारकांना याबाबत माहिती मिळेल आणि आगोदरपासूनच त्यांना आवश्यक नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल. निवेदनात म्हटले आहे की, मान्सून दरम्यान निर्माण झालेल्या आणि आवश्यक असलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी या धावपट्ट्या बंद असतील. प्रामुख्याने RWY 09/27 and RWY 14/32 या धवपट्ट्या तात्परत्या स्वरुपात बंद असतील. परिणामी त्या सकाळी 11.00 ते दुपारी 17.00 या कालावधीसाठी कार्यन्वीत नसतील. (हेही वाचा, Mumbai Airport: महिलेच्या बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा दावा, मुंबई विमानतळावर घबराट)

ट्विट

दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई हा देशातील दुसरा सर्वात व्यग्र असलेले विमानतळ आहे. जेथे 09/27 (प्राथमिक धावपट्टी) आणि 14/32 (दुय्यम धावपट्टी) या दोन छेदणाऱ्या धावपट्ट्या आहेत. दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी, एका घटनेत, VSR Ventures द्वारे संचालित Learjet 45 विमान, नोंदणी VT-DBL, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. विमान विझागहून मुंबईला जात असताना ही घटना घडली, त्यात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. त्यानंतर विमानतळावरील देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.