Mumbai: चोरीच्या उद्देशाने कॅब ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूहल्ला; 4 जण अटकेत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits : File Image)

कॅब ड्रायव्हरच्या (Cab Driver) डोळ्यात मिरची पूड टाकून चाकू खोपसून चोरी केल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी कॅब ड्रायव्हरच्या हाताला चाकू मारला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी (Chunabhatti Police) 4 जणांना अटक केली आहे. ललित तिवारी (Lalit Tiwari) असे पीडित कॅब ड्रायव्हरचे नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना 2 सप्टेंबर रोजी रात्री 3 च्या सुमारास घडली. आरोपींनी भायखळा (Byculla) हून मुलुंडला (Mulund) जाण्यासाठी कॅब घेतली. काही वेळाने चेंबूरच्या एवरड नगर येथे पोहचताच चौघांपैकी एकाने लघवीला जाण्यासाठी टॅक्सी थांबवण्यास सांगितले.

त्यानंतर फ्रंट सिटवर बसलेल्या व्यक्तीने चाकू काढला आणि कॅब ड्रायव्हरला धमकवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दुसऱ्याने ड्रायव्हरचा फोन आणि पॉकेटमधील 1200 रुपये काढून घेतले. ड्रायव्हरने प्रतिकार करताच चोरट्यांने त्याच्या हातावर चाकू मारला आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून तेथून पळ काढला. (Theft : नशा करण्यासाठी पैसे नसल्याने निवडला चोरीचा मार्ग, Mumbai पोलिसांना कळताच केली तुरूंगात रवानगी)

जखमी कॅब चालकाने ड्युडीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडे मदत मागितली. पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर एकाला लगेचच पकडण्यात आले. तर इतर तिघांना नाशिक मधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून फोन आणि पैसे देखील जप्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, घरकाम करणाऱ्या महिलेने गुंगीचे औषध देऊन वृद्ध महिलेकडून 8 लाख लुटल्याची घटना पुण्यातून समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली असून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.