अभिनेत्रीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात व्यावसायिक अमित अग्रवाल (Amit Agarwal) याला मुंबई पोलिसांनी 14 एप्रिल रोजी अटक केली आहे. एका 27 वर्षीय अभिनेत्रीने या व्यावसायिकावर बलात्काराचा आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. वारंवार बलात्कार करुन एमएमएस क्लिप (MMS Clip) द्वारे अमित या अभिनेत्रीला ब्लॅकमेल करत असे.
वृत्तानुसार, ही अभिनेत्री उत्तर प्रदेशातून मुंबईत आली होती. एका इव्हेंट दरम्यान तिची ओळख अमित अग्रवालसोबत झाली. त्यानंतर जवळीक वाढत गेल्याने दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. मात्र 2017 मध्ये पीडित अभिनेत्रीने अमित आणि तिचा इंटिमेट व्हिडिओ पाहिला. त्यानंतर अमितचे तिच्या सोबतचे वागणे देखील बदलले. तो लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंक करु लागला. त्यानंतर पीडित अभिनेत्री पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला. मग वर्षभरानंतर एका वकीलासोबत लग्न करुन तिने मुंबई गाठली. मात्र मुंबईत परत आल्यानंतरही अमितने तिचा पाठलाग सोडला नाही. (मायानगरी मुंबई महिलांसाठी असुरक्षित; गेल्या 5 वर्षात महिलांवरील अत्याचारात दुप्पटीने वाढ)
या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर अंधेरी येथे राहणाऱ्या व्यावसायिक अमित अग्रवाल याला अटक करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "अमितने पीडित अभिनेत्रीला एमएमएस क्लिपद्वारे बदनाम करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कचाट्यात सापडलेल्या अभिनेत्रीला त्याच्या काही अटी नाईलाजाने मान्य कराव्या लागल्या आणि त्याने तिच्यावरील लैगिंक अत्याचार सुरु ठेवला."