Image Used for Representational Purpose Only | Mumbai Police | (Photo credits: PTI)

मुंबईने आजवर अनेक धक्के पचवले आहेत. बॉम्बस्फोट असो, दहशतवाद हल्ला किंवा कोरोना व्हायरची दहशत या सगळ्यातून खमक्यापणातून अथांग सागराच्या किनाऱ्यावर उभं असलेलं शहर म्हणजे मुंबई. मुंबई कुणासाठी स्वप्नाचं शहर, कुणासाठी पोट भरणार तर कुणासाठी आयुष्य घडवणारं. पण काही असेही आहेत ज्यांना या मुंबईचं वैभव डोळ्यात येत आणि त्या माध्यमातून बऱ्याच मुंबई विरोधी कारवाई होण्याचं नियोजन आखल्या जातं. तरी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला ज्यानंतर मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र गृह खात्यात खळबळ माजली आहे. तरी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आलेला फोन हा एक धमकीभरा फोन होता ज्यात मुंबईत पुन्हा एकदा १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट होणार अशी माहिती देण्यात आली. तरी मुंबईत घडवून आणण्यात असलेल्या या बॉम्बस्फोटात शहरातील गजबजलेली ठिकाणं माहिम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होण्याचा दावा या धमकीच्या फोनवर करण्यात आला आहे. तरी फोन करणाऱ्या इसमाने यात एक अजब खुलासा केला आहे.

 

एवढंच नाहीतर काही वर्षांपूर्वी देशाला हादरवणारी घटना दिल्लीत घडली होती. ती घटना म्हणजे निर्भया प्रकरण. असीच घटना पुढच्या दोन महिन्यांत मुंबईतही होणार असल्याचंही या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं. तरी  मुंबई एटीएसनं हा फोन ज्या व्यक्तीनं केलाय त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई एटीएस, मुंबई क्राईम ब्रांच आणि सीआययूची टीम याप्रकरणी सखोल चौकशी करीत आहे. (हे ही वाचा:- Mumbai Fraud Case: मुंबईतील एका व्यावसायिकाला सोन्याऐवजी पितळ विकून घातला 30 लाखांचा गंडा, तिघांना अटक)

 

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं आहे. तरी या फोन करणाऱ्या व्यक्तीने फोन करण्यामागचं नेमक कारण काय किंवा या व्यक्तीने कुणाच्या सांगण्यावरु फोन केला तसेच पफओनवरी संभाषणात त्याने जी माहिती दिली आहे त्या संबंधीत विविध स्तरावर यंत्रणा तपास करीत आहे.