Mumbai BMC Recruitment 2021: बीएमसी मध्ये विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदांसाठी नोकरभरती; 12 ऑक्टोबर पूर्वी असा करा अर्ज
BMC | (File Photo)

मुंबई मधून कोरोनाचा विळखा थोडा सैल होत असल्याचं चित्र असताना आता अनेकांनी पुन्हा कामासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामध्ये बीएमसीने (BMC) देखील मुंबईत विकास अधिकारी (Community Development Officer) आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) या पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. 12 ऑक्टोबर 2021 पूर्वी या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी आपले अर्ज पाठवण्याचं आवाहन केले आहे. पात्र उमेदवार बीएमसी कार्यालयाच्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. (नक्की वाचा: SBI PO Recruitment 2021: 2000 प्रोबेशन ऑफिसर पदासाठी नोकरभरती; 25 ऑक्टोबर पर्यंत असा करा अर्ज) .

समाज विकास अधिकारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून समाजकार्याची पदवी घेतलेला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असावा. हनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर 45,000/- रुपये प्रतिमहिना मानधन दिले जाणार आहे.

सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून समाजकार्याची पदवी घेतलेला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असावा. हनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर 35,000/- रुपये प्रतिमहिना मानधन दिले जाणार आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन .

समाज विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदासाठी कंत्राटी तत्त्वावर नेमणूका केल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज फुलस्केप कागदावर लिहून पोस्ट करायचा आहे. अर्जात नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव नमूद करणं आवश्यक आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं सोबत जोडणं देखील गरजेचे आहे.