मुंबई शहरामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता मुंबई महानगर पालिकेने धारावीतील भाजी विक्रेते, फळ विक्रेते सह फेरीवाल्यांना धारावीतील कंटेनमेंट झोन (Containment Area), बफर झोन (Buffer Zone)मध्ये आता व्यवसाय करण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान धारावीतील कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील धारावी हा अतिशय दाटीवाटीचा भाग आहे. या भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. दरम्यान त्याचा अधिक फैलाव होऊ नये. यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहे. सध्या नागरिक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामधून फार्मसी म्हणजे औषधं केंद्र बंद करण्यात आलेली नाहीत. मात्र धारावीत नागरिकांना घरपोच भाजीपाला आणि किराणा माल मिळेल याची खात्री केली जाणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्याची सुरूवात होईल. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई शहरातील 381 ठिकाणं BMC कडून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी स्वतः धारावी परिसरामध्ये येऊन विभागाची पाहणी केली यावेळेस स्थानिक आमदार वर्षा गायकवाडदेखील तेथे उपस्थित होत्या. नागरिकांना याभागात कटाक्षाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागामध्ये विनाकरण गर्दी होणार नाही याची खात्री करा असे आदेशही देण्यात आले आहे. दरम्यान धारावीला पूर्णतः लॉकडाऊन करण्याची खासदार राहुल शेवाळे यांची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवल्या 'या' उपाययोजना सुचवल्या होत्या.
ANI Tweet
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) orders ban on all vegetable/fruit markets, hawkers & sellers in containment area/buffer zone in Dharavi, during the lockdown period, as a precaution against #COVID19. Pharmacies in the area are allowed to remain open. #Mumbai #Maharashtra pic.twitter.com/UdcJiAgmYa
— ANI (@ANI) April 9, 2020
धारावीमध्ये 1 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला होता. दिवसेंदिवस या भागातील रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात आज एका दिवसात 162 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1297 पर्यंत पोहचला आहे.