Mumbai: मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला 'प्रतिभा टॉवर' (Pratibha Tower) अखेर 35 वर्षानंतर महापालिकेकडून (BMC) पाडण्यात येणार आहे. या टॉवरच्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. तसेच भवन निर्माण नियमांचे उल्लंघन करुन हा टॉवर उभारल्यानंतर तत्कालीन कलेक्टर अरुण भाटिया यांनी टॉवर उभारणीप्रकरणी झालेला भ्रटाचार उघडकीस आणला होता. तसेच शहरातील हा प्रथम फ्लोर स्पेस इंडेक्स घोळाळा म्हणून मानला जातो.
पेडर रोड (Pedder Road) येथील ब्रीच कँन्डी (Breach candy) येथे हा टॉवर उभारण्यात आला आहे. तर 1990 रोजी महानगरपालिकेने या 36 मजली टॉवर मधील वरील 8 मजले अवैध असल्याने ते पाडण्यात आले होते. तसेच एका मजल्यावर दोन फ्लॅट अशी रचना केली होती. त्याचसोबत फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठ मोठ्या दिग्गज व्यक्तींनी यामध्ये गुंतवणुक केली होती. यामधील एक लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी ही प्रतिभा टॉवरमध्ये घर खरेदी केले होते. तसेच अन्य एनआरआय आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या मालकांनी सुद्धा येथे घर खरेदी केले होते.
इमारतीच्या 'हाऊसिंग सोसायटी'मध्ये एकूण 35 सदस्य आहेत. त्यातील काहींनी उरलेले 26 मजले तोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा टॉवर पाडण्याचे काम जोरात सुरु असल्याचे सांगितले आहे. सोसायटीचे सचिव आणि दुबईत वास्तव्यास असणारे जयंत वोरा यांनी असे सांगितले आहे की, टॉवर पुन्हा बांधण्यात येईल किंवा ती जागा विकली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच टॉवर पाडण्याशिवाय कोणता दुसरा उपाय नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिभा टॉवरचा घोटाळा पहिल्यांदा 1984 मध्ये चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा तत्कालीन कलेक्टर भाटिया यांनी टॉवर बाबत सर्व माहिती जमा करत खोटे पुरावे सादर केल्याचे सिद्ध केले होते. तसेच बिल्डरने सादर केलेल्या जमीनीच्या पुराव्यात 7,197 मीटर जमीनीएवजी 9.282 मीटर पेक्षा अधिक भूखंड असल्याचे खोटे सांगितले होते. तसेच खोटे बोलून 27.000 स्क्वेअर फुट जागेवर अतिरिक्त फ्लॅटची बांधणी केली होती. तसेच हे प्रकरण भाटिया यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती. तसेच घोटाळ्यात सामिल असलेल्या एकाही अधिकाऱ्याला अद्याप अटक झाली नसल्याचे भाटिया यांनी सांगितले आहे.