मुंबई महापालिकेत (BMC) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 रुपयांत जेवणाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या थाळीमध्ये कर्मचाऱ्यांना डाळ, चपाती, दोन भाज्या आणि भात दिला जाणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या निवडणूकीच्या वचननाम्यात 10 रुपयात थाळीचे आश्वासन दिले होते. यापूर्वी जम्मू येथे शिवसेनेने गरजू आणि गरिबांना दहा रुपयात जेवण सुरु केले. ही योजना मात्र शिवसेनेच्या कार्यालयात सुरु करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, श्री महाराजा गुलाबसिंग रुग्णालय आणि जम्मू तवी रेल्वे स्थानकात हे दहा रुपयांमध्ये पूर्ण जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या योजनेची सुरुवात झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले आहे की, 10 रुपयात थाळी हे शिवसेनेच्या वचननाम्याच्या एक भाग आहे. महापालिकेच्या कॅन्टीनकडे हा ऑप्शन होता त्यामुळेच आम्ही येथून याची सुरुवात केली आहे. तर लवकरच ही योजना सामान्यांसाठी सुद्धा सुरु केली जाणार आहे.(शिवसेनेच्या 10 रु. मध्ये थाळी योजनेला सुरवात; प्रतिदिन 500 लोकांसाठी बनणार 'साहब खाना')
ANI Tweet:
Kishori Pednekar, BMC Mayor: The Rs 10 meal scheme is a part of Shiv Sena's manifesto. Since the BMC canteen already had the option, we decided to introduce it here. The scheme will be soon introduced for the common people. https://t.co/DDoemaWce8 pic.twitter.com/L3KdN9rYLl
— ANI (@ANI) December 20, 2019
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान शिवसेनेने त्यांचा वचननामा जाहीर केला होता. त्यानुसार शिवसेनेची सत्ता आल्यास नागरिकांना 10 रुपयात जेवण मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र ही योजना अन्य राज्यात आधी पासूनच सुरु करण्यात आली आहे. तमिळनाडू मधील अम्मा कॅन्टीन, कर्नाटक मधील इंदिरा कॅन्टिन आणि दिल्लीतील जन आहार यांच्या तर्फे नागरिकांना स्वतात पोटभर जेवण उपलब्ध करुन देतात.