Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 31 वर्षीय कर्मचाऱ्याला बुधवारी नागरी संस्थेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पार्क साइट पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी समीर बबन पडेलकर हा बीएमसीच्या डी-वॉर्ड ऑफिसमध्ये एक दशकाहून अधिक काळ मजूर म्हणून काम करत आहे. त्याने गेल्या चार वर्षांत नोकरीच्या बहाण्याने 20 हून अधिक लोकांची फसवणूक केली. समीरने या प्रत्येकाकडून किमान 3 ते 4 लाख रुपये उकळले आहेत. प्रफुल्ल गमरे याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे समीरला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरीसाठी इच्छुक असलेल्या 30 वर्षीय दिवा, ठाण्यातील रहिवासी प्रफुल्ल गमरे यांची 2018 मध्ये एका कॉमन मित्रामार्फत पडेलकरशी भेट झाली. समीरने तेव्हा त्याला नोकरीचे आश्वासन दिले होते. या नोकरीच्या बदल्यात समीरने प्रफुल्लला 1 लाख भरण्यास सांगितले. त्याने नोव्हेंबर 2018 मध्ये 50,000 चा पहिला हप्ता घेतला. नंतर, आरोपीने तक्रारदाराकडून ऑक्टोबर 2020 पर्यंत एकूण 4.5 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर बदलला.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रफुल्लला नोकरी न मिळाल्याने तसेच त्याचे पैसेही परत न प्राप्त झाल्याने त्याने पार्क साईट पोलिसांशी संपर्क साधला. विक्रोळी परिसरात प्रफुल्लने आरोपीला समीरला पैसे दिले होते., पोलिसांनी त्याचे निवेदन नोंदवले आणि पडेलकर याच्याविरुद्ध फसवणूक आणि विश्वासभंगाचा गुन्हा दाखल केला. पार्क साइट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीच्या घरी भेट दिली मात्र तो तिथे सापडला नाही. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील वाहनचालकांना सीएनजी पुरवठ्यातील कमी दाबाचा फटका, अनेक सीएनजी पंप बंद)

पडेलकर सायन परिसरात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तेथून पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मेर म्हणाले की, चौकशीदरम्यान आरोपीने गेल्या चार वर्षांत अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली.