कुर्ला( Kurla), ठाणे (Thane), डोंबिवली (Dombivli), कल्याण (Kalyan), या रेल्वे पोलिसात (Mumbai Railway Police) मोठा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा रेल्वे पोलिसांना मिळणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई रेल्वे पोलीस नेहमी महत्वाची भुमिका बजावत असतात. याआधी मुंबई रेल्वे पोलिसांना 12 ते 14 तास ड्युटी बजावावी लागत होती. परंतु, 1 नोव्हेंबर पासून मुंबई रेल्वे पोलिसांना अवघे 8 तासच ड्युटी करावी लागणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्तालयाने दिली. सध्या वरील पोलीस ठाण्यात ही सुविधा मिळणार आहे. जर याठिकाणी यशस्वी ठरल्यास ही सुविधा इतर सर्व पोलीस ठाण्यात राबवण्यात येणार आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकात महिला डब्यात गस्त घालणे, रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या प्रवाशांचे अपघात, प्रवाशांची होणाऱ्या चोरीचा गुन्हा नोंदवून तपास करणे आणि अतिसंवेदनशील ठिकाणी खडा पाहरा देणे असे कामे रेल्वे पोलीस ड्युटीवर असताना करत असतात. यामुळे त्यांना अनेकदा 16 तासांपेक्षाही अधिक वेळ ड्युटी करावी लागते. यातच व्हीआयपी बंदोबस्त असेल तर, मग घरी कधी जाणार याची पोलिसांना काहीच कल्पना नसते. यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागले आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा-मुंब्रा: ट्रॅफिक पोलिसाने हटकल्यावर तरुणाने केला हल्ला, कपडे फाडून भर रस्त्यात केली मारहाण
रेल्वे पोलिसांची मंजूर पदे आणि उपस्थित असलेले संख्या बळ लक्षात घेऊन चार रेल्वे पोलिस ठाण्यात हा उपक्रम शुक्रवार, १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे.