BEST and PhonePe (Photo Credits: Twitter/Facebook)

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) एक मोठी लढाई लढत असून आपल्या देशाला यातून वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात सोशल डिस्टंसिंग (Social Distancing)  हा महत्त्वाच मुद्दा असल्यामुळे शासन आपापल्या राज्यात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यात दळणवळणाच्या सद्य स्थितीत सुरळीत सुरु असलेल्या मुंबईच्या बेस्ट बसेस (BEST) ने एका नवीन उपक्रम सुरु केला आहे. ज्यात तुम्हाला आता तिकिटाचे पैसे देण्यासाठी कंडक्टरला पैसे न देता डिजिटल ऑनलाईन पेमेंट UPI च्या माध्यमातून करता येणार आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बेस्ट ने दिलेल्या माहितीनुसार, BEST ने PhonePe या डिजिटल पेमेंट अॅपशी भागीदारी केली असून त्यानुसार आता UPI Code द्वारेही बस तिकिटाचे पैसे भरता येणार आहेत. यामुळे सोशल डिस्टंसिंगचा नियम योग्य रित्या पाळला जाईल असेही बेस्ट करुन सांगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus In Mumbai Updates: मुंबईत कोरोनाचे आणखी 2256 रुग्ण आढळले असून 31 जणांचा आज बळी गेल्याची BMC ची माहिती

यासाठी मुंबईतील 10,000 कंडक्टरांचा Unique QR Code बनविण्यात आला आहे. ज्याच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरता येतील. या महामारीच्या परिस्थितीत हा देवाणघेवाणीचा एक उत्तम पर्याय म्हणून पाहिला जात आहे. त्यात जर प्रवाशांनी आणि कंडक्टरने अशा पद्धतीने मार्ग अवलंबला तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे हितावह ठरेल. रोज बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय राहिल. यात आणखी एक फायद्याची गोष्ट म्हणजे यात प्रवाशांना सुटे पैसे बाळगणे वा पैसे बाळगणे यासारख्या गोष्टींपासून सुटका होईल.

दरम्यान कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे.