Honey Trap Case | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: (File Photo)

इंस्टाग्राम वर परदेशी नागरिक असल्याचं भासवत एका तरूणीने रचलेल्या हनी ट्रॅपमध्ये गिरगाव मधील एका डायमंड ब्रोकरने (Diamond Broker) सुमारे 1 कोटी 16 गमावल्यचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतात सोन्याचा व्यवसाय करण्याची इच्छा प्रकट करून तरूणीने काही अमेरिकन डॉलर्सचे पार्सल पाठवले. हे पार्सल विमानतळावरून घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायमंड ब्रोकरची लूट झाली. आर्थिक फसवणूकीमध्ये त्याने 1 कोटी 16 लाख रूपये गमावले. दरम्यान या प्रकाराची मुंबईच्या व्ही रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरगावमधील डायमंड ब्रोकर्सला 10 ऑक्टोबर दिवशी इंस्टाग्रामवर ॲलेक्स झेंडरा या तरुणीच्या नावाने रिक्वेस्ट आली. ही रिक्वेस्ट स्वीकारताच दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मोबाईल नंबर देण्यात आले. या तरूणीने आपण लंडनमध्ये खाजगी जहाजावर कॅप्टन असल्याचा दावा केला. नंतर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान या प्रकारामध्ये डायमंड ब्रोकर देखील विवाहीत असून तिला भुलला. तिची गिफ्ट स्विकरण्यासाठी त्याने वांद्रे येथील कार्यालयाचा पत्ता दिला.

सोने-चांदीचा व्यवसाय करण्यासाठी 5 लाख डॉलर आणि ॲलेक्स हिने पाठविलेल्या गिफ्टची ब्रोकर वाट पाहत होता. नंतर काही दिवसात त्याला कस्टम मधून फोन आला आणि वस्तूंसाठी काही रक्कम टॅक्सच्या स्वरूपात भरण्यास सांगितले. नफा होईल या आशेने या डायामंड ब्रोकरने देखील पैसे भरण्याची तयारी दाखवली आणि नंतर टप्प्याटप्प्याने 60 लाख 49 हजार ट्रान्सफर केले.