मुंबई: वांद्रे, माटुंगा आणि धारावी येथे 13 सप्टेंबरला 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार
Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील वांद्रे (Bandra), माटुंगा (Matunga) आणि धारावी (Dharavi) येथे उद्या (13 सप्टेंबर) 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचा निर्णय माहिपालिकेने घेतला आहे. मुंबईतील पाण्याच्या पाईपलाईन मधून होणारी गळती थांबवण्यासाठी त्याबाबत कामे करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते शनिवार (14 सप्टेंबर) दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वांद्रे रेल्वेस्थानकाजवळ राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्याचसोबत माटुंगा लेबर कॅम्प आणि धारावीच्या नागरिकांची सुद्धा तीच स्थिती होणार आहे.

सांताक्रुझ पूर्व येथे 2,400mm अप्पर वैतारणाचे पाणी सोडण्यात येते. परंतु याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिकेकडून येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.यापूर्वीसुद्धा जुलै महिन्यात 9 आणि 10 तारखेला मुंबईतील पवई ते माहिम दरम्यान पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यावेळी ही पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. या दरम्यान अंधेरीतील विविध भागांना या पाणी कपातीचा फटका बसला होता.(मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68 %)

गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट ओढावणार असल्याची स्थिती निर्माण झाली होती. तर तलावात पाण्याचा साठा अतिशय कमी प्रमाणात झाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी 10 टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. परंतु यंदा राज्यात झालेल्या पुरसेशा पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव भरले असून त्यात एकूण पाणीसाठी 85.68 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.