Rain Update: मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी
Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

ऑक्टोबर संपायला आला आहे तर मुंबईसह (Mumbai) राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. परतीच्या पावसाने शहरी तसेच ग्रामिण भागात चांगलाचं धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं आहे तर शहरी भागातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळताना दिसत आहे. तर येणारे पुढील दोन दिवस  हवामान विभागाकडून (IMD) मुंबईसह उपनगरास येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आठवड्याच्या पहिल्याचं दोन दिवसात  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने मुंबईकरांची चांगलीचं तारांबळ उडाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभुमिवर मुंबईकरांची लगबग सुरु असतानाचं पावसाची विजांच्या कडकडाटासह ही हजेरी मुंबईकरांसाठी आव्हानात्मक असणार आहे.

 

मुंबईसह उपनगरात म्हणजेचं ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), नवी मुंबई (Navi Mumbai) या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  हवामान विभागाकडून (IMD) संबंधीत विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. पण या पावसानंतर मात्र मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातून (Maharashtra) मान्सून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. म्हणजेचं राज्यातील नागरीकांना दिवाळासण अगदी आनंदात निरभ्र आकाशासह साजरा करता येणार आहे. (हे ही वाचा:- Mumbra Fire: मुंब्य्रातील शीळ फाट्याजवळील खान कंपाऊंडच्या गोदामाला भीषण आग)

 

तरी हा आठवडा मात्र पावसाचा किंवा मान्सून परतण्याचा शेवटचा आठवडा असल्याने मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता नाकारता येणार नाही. कारण फक्त मुंबईतचं (Mumbai) नाही तर राज्यातील कोकण (Konkan), मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भासह (Vidarbha) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाने गेल्या दमदार हजेरी लावली आहे.तसेच या आठवड्यात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.