चालकाचे नियंत्रण सुटल्याने अमर महल पुलावरून (Amar Mahal flyover) एक रुग्णवाहिका खाली दुकानावर कोसळल्याची घक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मुंबई (Mumbai) येथील चेंबूर (Chembur) परिसरात गुरुवारी रात्री 9 च्या घडली आहे. या अपघात दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी रुग्णवाहिका पुलाखालील एका दुकानावर कोसळली, तेव्हा ते दुकान बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन जात होती. मात्र, रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. यात चालक आणि इतर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, रुग्णवाहिकेतून घेऊन जाणारा मृतदेह कोरोनाबाधिताचा होता की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- Nagpada Building Collapse: मुंबईतील नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: An ambulance fell off Amar Mahal flyover in Chembur, on a shop below, earlier tonight. Driver and another occupant of the ambulance received minor injuries. The shop was closed at the time of the incident. pic.twitter.com/4ypqX3aoKC
— ANI (@ANI) August 27, 2020
अमल महल पुल खूप वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. यातच वरील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. तसेच चेंबूर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.