आजपासून ठाणे आणि नवी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर असून वाहतुकीबाबत काही बदल करण्यात आलेत.मुंबई महानगर क्षेत्रात वाढणाऱ्या प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालायने 3 दिवसात प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करा असे निर्देश दिले होते. दोन्ही महापालिकांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच भरारी पथक नेमून मुंबईतली एकही डॅब्रिजची वाहने ठाणे आणि नवी मुंबई शहरात येण्यापासून रोखली जाणार आहेत. इमारतींच्या बांधकाम ठिकाणी धूळ उडू नये यासाठी विकासकांनी उपाययोजना केल्यात की नाही याची या भरारी पथकाकडून पाहणी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज, धूर ओकणाऱ्या वाहनांवर ठेवणार करडी नजर)
ठाणे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाई बाबतची माहिती ही दिली आहे. तसेच वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी माॉर्निंग वॉक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे. तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे- खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रशासनाच्या या सूचनांना मुंबईत काही ठिकाणी चांगला प्रतिसाद देण्यात आलाय. तर काही ठिकाणी मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील चित्र आहे.