बनावट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी असल्याचे दाखवून एका भोजपुरी अभिनेत्रीला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनी एनसीबीचे खोटे अधिकारी दाखवून भोजपुरी अभिनेत्रीचा छळ केला होता तसेच तीला ब्लॅकमेल केले होते. त्यामुळे अभिनेत्रीने आत्महत्या केली. सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे नावाच्या या दोन आरोपींनी एका 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला एनसीबी अधिकारी असल्याचे भासवून एका पार्टीत पकडले होते. आरोपींनी या अभिनेत्रीकडे 40 लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर 20 लाखात हे प्रकरण मिटले.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्रीसोबत अजीम काझी आणि आणखी एक तरुण होता. हे तिघे एका हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते, तिथे एनसीबीचे अधिकारी अशी ओळख सांगत हे दोन्ही आरोपी पोहोचले. ही संपूर्ण योजना हे दोन आरोपी, काझी आणि अन्य एका तरुणाची होती. या चौघांचा अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवून तिच्याकडून पिक्से उकळण्याचा कट होता. त्यानंतर या अभिनेत्राला पैशांसाठी त्रास देणे सुरु झाले, तीला ब्लॅकमेल केले गेले. शेवटी, अभिनेत्री इतकी नैराश्यात गेली की तिने 23 डिसेंबरच्या रात्री जोगेश्वरी येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. (हेही वाचा: महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींचा विरोध, म्हणाले या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो)
आंबोली या आत्महत्येप्रकरणी आधी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला, नंतर या प्रकरणाच्या तपासात काही पुरावे समोर आले व आत्महत्येचे कारण पार्टीत आलेल्या बनावट एनसीबीने मागितलेली वसुली असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी भादंविच्या कलम 306, 170, 420, 384, 388 आणि 389, 506, 120 ब अन्वये 2 आरोपींना अटक केली आहे, तर अन्य 2 आरोपी फरार आहेत. याप्रकरणी तपास सुरू आहे.