मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातील कपाडिया नगरजवळ एका पत्रकराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चुकीच्या दिशेने कार चालवत होते त्यावेळी संबंधित पत्रकाराने त्यांना योग्य दिशेने कार चालवण्यास विनंती केली. त्यानंतर रागाच्या भरात कारचालकाच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कारमधून बाहेर येत पत्रकाराला कानाखाली मारली. दरम्यान लगेच कारचालवत असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या उजव्या पायावरून कार घातली. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी कुर्ला डेपोच्या समोर झाली. मोहम्मद जावेद असं पत्रकाराचे नाव आहे. मोहम्मह हे 'जहॉं का इंसाफ'चे संपादक आणि 'दैनिक रोझनामा सहारा'चे रिपोर्टर आहे. सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास जावेद कपाडिया नगरजवळ पोहोचले असता त्यांनी लाल रंगाची स्विफ्ट कार चुकीच्या दिशेने जात असल्याचे पाहिली. त्यावेळी त्यांनी चालकाला इशारा केला की, तो कार चुकीच्या दिशने चालवत आहे. त्याला परत जाण्यास सांगितले, परंतु कार चालकाने न ऐकता कार चालवणे सुरु ठेवले. हेही वाचा- मुंबईमध्ये 30 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी; ड्रोन, पॅराग्लायडिंग इ. वर 18 जानेवारीपर्यंत बंदी
त्यानंतर कारमधून एक जण उतरला आणि त्यांच्या कानाखाली मारली आणि त्यांच्या पायाखालून कार नेली. त्यांनी लगेच फोन काढून पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर एकाने त्यांच्या हातातला फोन हिसकावून घेतला, त्यानंतर लगेच मोहम्मद यांनी दुसरा फोन खिशातून काढला आणि हा संपुर्ण प्रकार पोलिसांना फोन करून सांगितला. दरम्यान दोघेही फरार झाले. मोहम्मद यांनी कारचा नंबर नोंदवून घेतल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांही आरोपींना शोधून काढले आणि पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु पोलिसांनी अद्याप एकाला ही अटक केली नाही. मोहम्मह यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिस घटनेची संपुर्ण चौकशी करत आहे.