Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai) मधील कांदिवली (Kandivali) भागामधून एक ऑनलाईन फसवणूकी (Online Fraud) ची घटना समोर येत आहे. एका वृद्ध माणसाला सायबर गुन्हेगारांनी (Cyber Fraudsters) 7 लाखांचा गंडा घातला आहे. या 55 वर्षीय व्यक्तीला खोट्या नोकरीचे (Fake Job) आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये उकळले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पीडित व्यक्तीने या संदर्भात चारकोप पोलिस स्टेशनमध्ये (Charkop Police Station) एफआयआर (FIR) दाखल केली आहे. (Pimpri Chinchwad: 50 पेक्षा जास्त महिलांना लग्नाचे आमिष दाखवून 1 कोटीहून अधिक रुपयांना घातला गंडा; व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक)

पीडित व्यक्तीला 10 ऑक्टोबर रोजी आपल्या व्हॉट्सअॅपवर नोकरी संदर्भात एक मेसेज आला. एका ई-कमर्शियल पोर्टलवर काही ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास तुम्हाला आकर्षक कमिशन मिळेल, असे या मेसेजमध्ये लिहिले होते. या मेसेजला बळी पडून पीडित व्यक्तीने पहिल्या दिवशी 1000 रुपये डिपॉझिट केले. त्या 1000 रुपयांवर पीडित व्यक्तीला 885 रुपयांचा नफा मिळाला.

या आकर्षक नफ्याला पाहून पीडित व्यक्तीने लालसापोटी 7 लाख 19 हजार रुपये यात गुंतवले. त्यानंतर या नवीन रक्कमेवर 4 लाख 19 हजार रुपयांचे प्रॉफिट तुम्ही कमावले असून तुमचे एकूण नफा 11.36 लाख रुपये झाल्याचे आरोपीने पीडित व्यक्तीला सांगितले. परंतु, ही सर्व रक्कम काढून घेण्यासाठी अजून रक्कम भरण्यास आरोपीने पीडित व्यक्तीला सांगितले. हा सर्व प्रकार पीडित व्यक्तीला संशयास्पद वाटला. पीडित व्यक्तीने आपल्याकडचे सर्व पैसे संपल्याचे सांगितले तेव्हा आरोपीने पीडित व्यक्तीचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याची खात्री पडली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.