लैंगिक उत्तेजनेसाठी चक्क स्टीलची रिंग परिधान करणाऱ्या माणसाचा जीव, शस्त्रक्रिया करून वाचवण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईतील (Mumbai) एका व्यक्तीने सेक्समध्ये (Sex) अतिसुख मिळवण्यासाठी आपल्या लिंगाभोवती स्टीलची रिंग घातली होती. या दरम्यान त्याचा प्रायव्हेट पार्ट या रिंगमध्ये अडकला. मात्र लाजेखातर त्याने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली नाही. त्यानंतर त्याने स्वतः ही रिंग काढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. मंगळवारी त्याची स्थिती खराब झाल्याने, अखेर त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यावर सर्वप्रथम जेजे हॉस्पिटलमधील, यूरोलॉजी विभागाच्या चिकित्सकांनी सर्व वैद्यकीय पद्धतींचा वापर करून रिंग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनाही ते जमले नाही. शेवटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. रात्री उशिरा पीडब्ल्यूडी कंत्राटदाराला हॉस्पिटलमध्ये बोलविण्यात आले व त्यांनी काळजीपूर्वक लिंगाभोवती असणारी ही रिंग कापली. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर कसा तरी त्याचा जीव वाचू शकला.
या व्यक्तीला शौचालयासाठी जायला त्रास होऊ लागल्यावर त्याच्या वेदना आणखीनच वाढल्या. त्यानंतर डॉक्टरांना लक्षात आले की, या व्यक्तीच्या शरीरात गॅंग्रिन जमा होऊ लागले आहे. वेळेत ही रिंग तोडण्यात यश आले नसल्याने या व्यक्तीच्या अंगाला सूज येऊ लागली. त्यानंतर मात्र गॅस मेटल कटरने ही रिंग तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पीडब्ल्यूडीची मदत घेतली गेली.आता या व्यक्तीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. (हेही वाचा: अति Sex आहे शरिरासाठी घातक; तुम्हीही जास्त सेक्स करता? निर्माण होऊ शकतात 'या' समस्या)
अशाप्रकारे लैंगिक सुख वाढवण्यासाठी लोक बेजबाबदार काम करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात, असे करणे चुकीचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.