मुंबई मध्ये 89 वर्षीय एका निवृत्त आर्मी मॅनने त्याच्या 81 वर्षीय पत्नीची आणि 55 वर्षीय मेंटली चॅलेंज मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघीही अंथरूणाला खिळलेल्या होत्या. रविवार संध्याकाळी अंधेरी येथील राहत्या घरी या हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः मेघवाडी पोलिस स्थानकात सोमवारी सकाळी सरेंडर झाले. आरोपीचं नाव पुरूषोत्तम सिंग गंगढोक (Purushottam Singh) आहे. पत्नी आणि मुलीची 10 वर्ष सेवा केल्यानंतर आता अजून त्यांना यातना नको या विचारातून त्यांचं आयुष्य संपवल्याचं आरोपीने म्हटलं आहे.
गंगढोक हे अंधेरीच्या शेर ए पंजाब कॉलनी मध्ये प्रेम संदेश सोसायटीमधील निवासी आहेत. अत्यंत शांतपणे ते मृत्यूमुखी पडलेल्या लेकी आणि पत्नीच्या रूममध्ये वावरत होते. खूनानंतर 12 तासांनी त्यांनी आपली मोठी मुलगी Gurbinder Kaur (58) हिला सोमवारी सकाळी खूनाची माहिती दिली.
TOI च्या वृत्तानुसार, 'गंगढोक हे आर्मी मध्ये एक्स सर्व्हिसमॅन होते. घरात किचन मधील सुरीने त्यांनी पत्नी आणि मुलीचा गळा चिरला. पत्नी आणि मुलीच्या यातना पाहू शकत नसल्याने हा खून केल्याची कबुली दिली असल्याचे' DCP (Zone X) Maheshwar Reddy यांनी सांगितले आहे. नक्की वाचा: Mumbai: राम मंदिराच्या रस्त्यालगत पार्किंग करण्यात आलेल्या गाडीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह .
Maharashtra| A 90y/o man, Purushottam Singh, arrested&sent to 3-day police custody after confessing to murdering his bed-ridden wife& mentally challenged daughter in Sher-e-Punjab Colony,as he was worried about what'd happen to them after he dies:Sr Insp Sanjiv Pimple,Meghwadi PS pic.twitter.com/1QBHmjcnQD
— ANI (@ANI) February 9, 2022
Gurbinder Kaur ही त्यांची लेक देखील शेर ए पंजाब कॉलनीमध्येच राहते. तिला हा प्रकार कळताच ती देखील पती आणि मुलांसह घरी आली. त्यावेळी वडील आतून लॉक असलेला दरवाजा उघडत नव्हते. त्यानंतर वडिलांनी पोलिसांना बोलावायला सांगितलं आणि दरवाजे त्यांच्यासाठी उघडतील असं सांगितलं. त्यावेळी Gurbinder Kaur पतीसह मेघवाडी पोलिस स्टेशन मध्ये गेले आणि पोलिसांसह परतले.
मेघवाडी पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांच्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. तेव्हा त्यांना दोघींचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तेव्हा खोलीत गंगढोक शांत बसले होते. मुलीने जेव्हा हा प्रकार का केलात? असा सवाल विचारला तेव्हा आजारपणातील त्यांच्या वेदना पाहू शकत नसल्याने 8.30 नंतर त्या झोपल्या तेव्हा हा खून केल्याचं त्यांनी सांगितलं.