वांद्रे येथे एक 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेला खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Times of India च्या रिपोर्टनुसार, या गर्भवती महिलेकडे COVID-19 टेस्ट रिपोर्ट नसल्याने तिला प्रवेश नाकारल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान या महिलेची प्रसुती कधीही होऊ शकते अशी स्थिती असताना या महिलेने आणि तिच्या कुटुंबाने सुमारे 6 तास हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गर्भवती महिलेने वांद्रे येथील Holy Family Hospital मध्ये नोंदणी केली असून तिचं डिपॉझिटदेखील भरलं होतं. दरम्यान या हॉस्पिटलमध्येच तिच्यावर स्त्रीरोगतज्ञांकडून मागील 4 महिन्यांपासून निगराणी ठेवली जात होती. मात्र कोणीही COVID-19 test करून घेण्याबाबत सल्ला दिल्याचं सांगितलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टरांनी तिला दाखल करून घेत COVID-19 test करून घेण्याचा सल्ला दिला.
महिलेला त्यानंतर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यासाठी तिचे कुटुंब तयार नव्हते मात्र नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. काही वेळातच महिलेची स्थिती थोडी सुधारल्यानंतर खाजगी लॅबमध्ये मंगळवारी तिची कोव्हिड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत अशा अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे जरी गरोदर महिला कोव्हिड 19 पॉझिटिव्ह असली तरीही त्यांची प्रसुती मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल आणि पार्ले येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये केली जावी अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.