मृत मुलाच्या जखमांवर आईकडून रात्रभर उपचार; मुंबई मधील हृदयद्रावक घटना
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) कलिना (Kalina) भागातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून आईने रात्रभर त्याच्यावर उपचार केले. ही महिला 70 वर्षांची असून मृत पावलेल्या त्यांच्या मुलाचे वय 42 इतके आहे. मुलाचा मृत्यू न झाल्याचे समजल्याने ती महिला त्याच्यावर उपचार करत राहिली. मात्र सकाळीही मुलगा उठत नसल्याने मृत्यू झाल्याचे महिलेचा लक्षात आले. (Mumbai: संपूर्ण लॉकडाऊन आईच्या मृतदेहासोबत घरात एकटीच राहिली महिला; शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर समोर आली ही धक्कादायक घटना)

प्राप्त माहितीनुसार, ही 70 वर्षीय महिला स्वत: अंथरुणाला खिळलेली आहे. सोमवारी रात्री बाथरुममध्ये घसरुन पडल्याने मृत्यू झाला. मात्र मुलगा हालचाल करत नाही यावरुन तो आजारी आहे अशी समजूत महिलेची झाली. त्यांनी मुलाचा मृतदेह ओढत स्वत:च्या बेडजवळ आणला. आणि मुलाच्या जखमांवर रात्रभर उपचार देखील केली. मात्र सकाळी देखील मुलगा काही हालचाल करत नसल्याने त्यांनी नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर नातेवाईक घरी आले त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (ठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला)

दरम्यान, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. हे कुटुंब मेघालयातील असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान मृत व्यक्तीची नोकरी गेल्याने हे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते.