Court (Image - Pixabay)

मुंबईत राहणाऱ्या 61 वर्षीय महिलेच्या पतीला सत्र न्यायालयाने आपल्या पत्नीला खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश दिले आहे. महिलेला औषधे तसेच इतर गरजेच्या गोष्टींसाठी पैशांची गरज असते यासाठी तिला मासिक खर्चासाठी पैसे द्यावे लागतील असे कोर्टाने म्हटले आहे. सदर महिलेचा 62 वर्षीय पती लग्नाच्या 45 वर्षानंतर अचानक 2020 पासून आपल्या सेक्रेटरीसोबत राहू लागला. यामुळे सदर महिलेला आपल्या दैनदिन गरजा भागवणे देखील कठीण होऊन बसले होते.

सदर महिलेचा पती हा मुंबईत एक उद्योजक असून शहरात त्याची जवळपास आठ कोटी रुपयांची संपत्ती आहे. महिन्याला हा व्यक्ती जवळपास 9 लाखाच्या आसपास कमावतो. कोर्टांने या व्यक्तीला 2020 पासूनचा थकबाकी भत्ता म्हणून सध्या 9 लाख रुपये देण्याचे आदेश देखील दिले आहे. कोर्टाने या व्यक्तीद्वारे सदर महिलेला 20202 पासून मासिक खर्च देण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका देखील निकाला काढली आहे.

सदर महिलेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याचे लक्षात घेत आणि ती वेगळी राहत असल्यामुळे त्यांच्या गरजा लक्षात घेत, त्या पुर्ण करण्यासाठी 10,000 महिना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. दरम्यान सदर व्यक्तीने आपण आपल्या बायको आणि मुलांपासून वेगळे राहत नसून त्यांनी सेक्रटरीसोबत राहत असल्याचे आरोप देखील खोडून काढले आहे. त्याच्यानुसार पत्नी आणि मुलांने आपल्याला घराबाहेर काढले आहे.