मुंबई: राजावाडी रूग्णालयात उंदराने चावा घेतलेल्या तरूणाचा मृत्यू
Hospital (Photo Credits: IANS)

मुंबई मध्ये घाटकोपर (Ghatkopar) परिसरात असलेल्या राजावाडी रूग्णालयामध्ये (Rajawadi Hospital) उंदराने आयसीयू (ICU) मध्ये असलेल्या एका रूग्नाचे डोळे कुडतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या रूग्णांचा काल (23 जून) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 24 वर्षीय तरूण श्रीनिवास यल्लपा असं त्याचं नाव असून मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनामधून समोर येईल असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनिवास ला दम लागत असल्याने राजावाडीत दाखल केले होते.

बीएमसी रूग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत तसेच या घटनेची गांभीर्याने दखल घेत भविष्यात असा प्रकार होणार नाही यासाठी काळजी घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: Mumbai: आयसीयू वॉर्डमध्ये रुग्णास डोळ्याजवळ चावला उंदीर; आवश्यक कारवाईचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आश्वासन.

 

श्रीनिवास याला श्वास घेण्यास त्रास होत होता. रविवार 20 जूनला त्याला राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर मेंदूज्वराचे निदान केले होते. सोबतच यकृतही बिघडल्याचे सांगितले. त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. तो बेशुद्धावस्थेत असताना उंदराने त्याच्या डोळ्याजवळच्या भागाला चावा घेतला. त्याच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा हा सारा प्रकार लक्षात आला. यानंअतर नर्स कडूनही उर्मट भाषेत उत्तरं देण्यात आल्याचा आरोप श्रीनिवासच्या कुटुंबियांनी केल्याचं मीडीया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे.