Coronavirus: मुंबईच्या मानखूर्द येथील बालगृहातील 18 मुलांना कोरोनाचा संसर्ग
Coronavirus. (Photo Credit: PTI)

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उल्हानगर महापालिकेकडून शनिवारी (28 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये 14 मुले कोरोना बाधित आढळली आहे. यातच मुंबईच्या (Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथील बालगृहातील (Children Home) 18 मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर बालगृहात एकच खळबळ माजली आहे. कोरोनाबाधित मुलांना वाशीनाका येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या लहान मुलांच्या आरोग्याची देखरेख केली जात आहे.

कोरोनाच्या तिसरी येत्या सप्टेंबर आक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक बाधा होईल, असाही अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. यामुळे राज्य सरकार, महानगरपालिका, वैद्यकीय प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण, मुंबई कोरोना हळूहळू हातापाय पसरत असल्याचे समोर येत आहे. मानखूर्द येथील 14 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या Marine Drive वर नागरिकांची तुफान गर्दी (See Pics)

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासात 345 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 43 हजार 498 वर पोहचली आहे. यापैकी7 लाख 22 हजार 39 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 15 हजार 974 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 3 हजार 36 सक्रीय रुग्ण आहेत.