मुंबईत येत्या 31 डिसेंबरच्या मध्य रात्रीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. तर ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, MIDC पोलीस अधिकारी नासीर कुलकर्णी यांनी असे म्हटले की, कोविड19 संदर्भात जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर आम्हाला कारवाई करावी लागेल. नागरिकांना मास्क घालण्याच्या सुचना आधीच देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा वेरियंट झपाट्याने राज्यभरात विविध ठिकाणी पसरत चालला आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा ही वाढला जात आहे. महाराष्ट्राच्या कोविड19 च्या बुलेटिननुसार, ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 31 वर पोहचला आहे. यामधील बहुतांश रुग्ण हे मुंबईतील असून 13 लहान मुलांचा समावेश आहे. त्यानंतर 10 पिंपरी-चिंचवड, प्रत्येकी दोन हे पुणे महापालिका, उस्मानाबाद आणि प्रत्येकी एक कल्याण, डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरार आणि बुलढाणा येथील आहे.(Omicron in Maharashtra: महाराष्ट्रात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या वाढली, दिवसभरात आढळले 4 नवे रुग्ण; जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या)
या सर्व रुग्णांपैकी 25 जणांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला गेल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात आणखी चार ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये दोन जण हे उस्मानबाद आणि प्रत्येकी एक मुंबई व बुलढाणा येथील आहे. सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसून आली आहेत. उस्मानाबाद येथील रुग्ण याने शारजा येथे प्रवास केला. अन्य बुलढाणा येथील रुग्णाने दुबई येथे प्रवास केला असून मुंबईतील व्यक्तीने आयर्लंडला प्रवास केला होता. या प्रकरणातील तीन रुग्णांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर त्याचे लसीकरणासाठी योग्य वय बसत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.