Mumbai: दुपारच्या जेवणावरुन भांडण झाल्याने 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मुंबईतील घाटकोपर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरातील एका 14 वर्षीय मुलीचे जेवणावरुन आपल्या आईसोबत भांडण झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीने आपल्या रुममध्ये स्वत:ला कोंडून घेत गळफास लावत आत्महत्या केली आहे.(Thane: परदेशी चलनाच्या नोटांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक; 25 लाख जप्त)

पंथनगर पोलीस स्थानकातील एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, ही घटना काल दुपारची आहे. त्यांना एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुलीने घरात पंख्याला गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तातडीने मुलीला घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, काल दुपारी एक मुलगी आणि तिच्या आईमध्ये खाणे खाण्यावरुन भांडण झाले. मुलील जेवण्यास सांगितले मात्र तिने ते खाल्ले नाही. यावरुन त्या दोघींमध्ये वाद झाला आणि मुलीला राग येत ती रुममध्ये निघून गेली.(Online Fraud: मुंबईमध्ये निवृत्त IAS Officer ने एअर तिकीट्स ची रिफंड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑनईन फसवणूकीतून गमावले 4.50 लाख रूपये)

मुलीला घरातल्यांनी दरवाजा उघडण्यास खुप वेळ आवाज दिला. परंतु तिने दरवाजा उघडला नाही पण जेव्हा तो तोडला तेव्हा मुलीने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. यामुळे पोलिसांकडून एफआयआर दाखल केला आहे. या संबंधित लोकांचा जबाब नोंदवला गेला आहे.