प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Facebooki)

पावासाळा सुरु होण्यापूर्वी पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत होती. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने दिले होते. परंतु 10 टक्के पाणीकपातीची निर्णय रद्द करण्यात यावा असे नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी म्हटले होते. मात्र आता राज्यात झालेल्या पुरेशा पावसामुळे भातसा, तानसा यांसारख्या धरणांसह तलावसुद्धा ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे आता मुंबईसह उपनगरांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह उपनगरात पाणीकपातीची तिढा सुटत नाही. परंतु यंदा राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलावसाठ्याच्या पाण्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा प्रश्न सुटण्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु पावसाळा संपण्यासाठी अजून सप्टेंबर महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल. (मुंबई: राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा, पाणीसाठ्यात आश्वासक वाढ)

परंतु गेल्या वर्षात महापालिकेने पाणीटंचाईमुळे पाणीकपात केली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या अभावाचा त्रास होत होता. मात्र आता गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे तलावांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये    आश्वासक वाढ झाली असल्याचे सांगण्यात येतेय