Doctors| Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा यंदा 10 जून पासून सुरू होणार आहेत. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या लांबणीवर टाकण्यासाठी मागणी सुरू होती पण या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. पण विद्यार्थ्यांना एक दिलासा देण्यात आला आहे. जर परिक्षार्थ्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली तर अशांसाठी विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहण्यासोबतच त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. दरम्यान कालच याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केली आहे. विद्यार्थी अनुपस्थितीत राहिल्यास तो attempt मोजण्यात येऊ नये अशी सूचना त्यांनी केली आहे.

कोविड 19 संकटामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतलेला निर्णय त्यांनी ट्वीट करत जाहीर केला आहे. दरम्यान या विशेष परिक्षांचं वेळापत्रक काही दिवसांनंतर जाहीर केले जाणार आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापिठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. CA Foundation Exam 2021: ICAI कडून यंदा सीए फाऊंडेशन परीक्षा 24 जुलै पर्यंत लांबणीवर; लवकरच जाहीर होणार सविस्तर वेळापत्रक.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे ट्वीट

दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवल्यास राज्यात कोणत्याही शासकीय रूग्णालय, शासनमान्य कोविड रूग्णालय मध्ये स्वतःची आरटीपीसीआर चाचणी मोफत करता येईल. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये राहण्याची इच्छा असल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळत त्यांना राहण्याची मुभा आहे. तसेच त्यांच्यासाठी वसतीगृहांच्या मेस/ भोजनव्यवस्था देखील सुरू करण्यात आल्या आहेत. या मध्ये वेळोवेळी वसतीगृह स्वच्छ ठेवण्याची, त्यांचे निर्जंतुकीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.