Image used for representational purpose. (Photo Credits: PTI)

देशातील विद्युत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असलेल्या 'महावितरण' (MSCB) कंपनीनत नोकरभतीसाठी अर्ज निघाले आहेत. तर महावितरण कंपनीकडे आतापर्यंत 2.50 कोटी एवढी ग्राहकांची संख्या असून 77 हजार समर्पित कर्मचारी कार्यरत आहे. तर कंपनीकडून नेहमीच उच्च शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रतिभा असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाते.

कंपनीच्या नवीन धोरणानुसार 2020 पासून सेवायोजन जाहीरातीमधून नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांची पूर्तता करुन GATE परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना येथे नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परंतु उमेदवारांची निवड त्यांना GATE परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता (वितरण)/सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.(MAHADISCOM Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये तब्बल 7 हजार पदांची नोकर भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा)

तर ज्या उमेदवारांना या नोकरभरतीच्या संधीचा लाभ घ्यायचा असल्यास याबद्दल अधिक माहिती त्यांच्या संकेस्थळावरुन देण्यात येणार आहे. मात्र महावितरण भरती प्रक्रियेत GATE परीक्षा उत्तीर्ण असे अत्यंत महत्वाचे आहे असे कंपीनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचसोबत सर्व अटी आणि नियामांची पूर्तता करुन उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.