Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pixabay)

नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) मध्ये तब्बल 7000 हजार पदांची नोकर भरती सुरु होणार आहे. विद्युत सहाय्यक पदासाठी 5000 जागा, तर उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 2000 जागांची ही नोकरभरती आहे. यासाठी मंडळाने वेबसाईटवर अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 12 वी पास इतकी आहे.

यासाठी वेबसाईटवर 13 जुलै 2019 पासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 जुलै 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचा फॉर्म, पात्रता, पदांचा इतर सर्व तपशील, वय मर्यादा, वेतनमान अशा सर्व गोष्टींची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची तारीख - 13 जुलै 2019

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 जुलै 2019

पदे:

विद्युत सहाय्यक पदे – 5000

उपकेंद्र सहाय्यक पदे - 2000

वेतन:

रु. 7,500 (प्रथम वर्ष); रु. 8,500 (द्वितीय वर्ष); रु. 9 500 (तृतीय वर्ष)

पात्रता निकष:

12 वी पास तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वय:

18 ते 27 वर्षे (हेही वाचा: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग मोकळा, 'या' विभागातील रिक्त पदांवर लवकरच होणार भरती)

या भरतीसाठी  विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहणार आहे. ही भारती कंत्राटी पद्धतीच्या स्वरुपात होणार आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर निकारी देण्यात येणार आहे.