MSBSHSE Supplementary Examination SSC Results 2019: महाराष्ट्र पुरवणी परीक्षा 12वीचा निकाल जाहीर; SSC च्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या रिझल्टचे वेध
SSC Result 2019 (Photo Credits: File Photo)

Maharashtra SSC Supplementary Exam Result Date:  महाराष्ट्र बोर्डाचा पुरवणी परीक्षांचा आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. आज शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेवसाईट 12वीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुरवणी परीक्षांच्या निकालाची (Maharashtra SSC Supplementary Exam Result)  उत्सुकता लागली आहे. हे निकाल पुढील दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.  Maharashtra HSC Supplementary Results 2019: महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा 12 वी चा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असा पहा Online Result

महाराष्ट्रात यंदा 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट दरम्यान पार पडल्या. बारावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान घेतली होती. तर दहावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान पार पडली. आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एसएससी म्हणजे 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत.  Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा

यंदा मार्च महिन्यात झालेल्या परिक्षेसाठी 14,21,936 विद्यार्थी बसले होते. त्यामधील 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर मार्च महिन्यात झालेल्या 10 वी बोर्ड परिक्षेच्या निकालाचा टक्का घसरला असून 77.10 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.